Saturday 5 March 2016

एक बॅचलर

एक बॅचलर असाही राहतो
तो रोज सकाळी उठतो
सतरंजीच्या घडया घालतो,
आन्हीक उरकुन चहावाल्यासोबत 2 गप्पा मारतो.
९ च्या ठोक्याला ऑफिस गाठतो
६ च्या ठोक्याला ऑफिस सोडतो
पुन्हा चहावाल्यासोबत  गप्पा
घरी येवून तीच मसाला maggi करून खातो
सतरंजीच्या घडया उकलुन त्यावर झोपी जातो, चार्ली चॅप्लिनच्या टांगलेल्या चित्राकडे बघत.....
उदया पुन्हा तोच चहा, 
तेच ऑफिस, 
तीच maggi
एक बॅचलर असाही राहतो

Tuesday 8 December 2015

काही न पाठवलेली पत्रे

प्रिय,

खरं तर हा शब्द आता वापरायचा की नाही हे मला माहित नाही. कारण मी तुझ्या साठी जुनाच 'तो' असेल का माहीत नाही, तरी पण 'प्रिय'.
आता तू कदाचित म्हणशील फोन, व्हॉट्सऍप, एसएम्एस च्या जमान्यात हा पत्र प्रपंच कशासाठी ??? पण पत्रातून जे काही बोलता येतं ते इतर कशातून नाहीच जमत. खरं तर खुप आधीच हे पाठवायच होतं, गेल्या कित्येक दिवसांपासून मनात साठवून ठेवलेलं बोलायचं होतं पण हिम्मत करून लिहितोय. आपली भांडण ही तुला आणि मला काही नविन नव्हती, पण त्यादिवशीचा नूर काही वेगळाच होता. माझ्या नकळत माझा स्वाभिमान दुखावल्या गेल्याने मी तुला भरपूर बोललो ही. असं म्हणतात 'जो बूँद से गई वो हौद से नहीं आती' तरी पण सॉरी.  आपण दोघांनिही सांभाळून घ्यायला हवं होत पण नाहीच जमलं ते आणि शब्दाला शब्द वाढत गेला.  पण मी काय म्हणतो झालं गेलं विसरून जाऊन करुया ना नवी सुरवात 'मरीन ड्राइव्ह' च्या सूर्यास्ताच्या साक्षीने...
करशील ना एवढं आपल्यासाठी  ????

(तुझाच) मित्र

Tuesday 1 December 2015

बुजगावणे

पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा
स्वप्नांवर होता ताबा चांदण्यांचा

पाखरे अशी येतात कुठून येथे
साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा

जरा मोकळे श्वास घेऊ आधी
मग सोडवू प्रश्न अर्भकांचा

काल पर्यंत होते सारे षंढ इथे
आज होतो एल्गार स्वरांचा

जगतानाच त्यांनी जाळले मला इथे
मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा

#जिप्सी

Saturday 21 November 2015

That is you

I am jealous of your heart
Which is always with you,
But not me.....

I am jealous of your dreams,
In which you roam around all over the world .....

I am jealous of that seawaves ,
that touches you daily....

But surely I m not jealous of one thing.

That is you, that is you.....


#Gypsy

Saturday 31 October 2015

संकष्टी

आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी,
तू कशी दिसत होतीस गं ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???

DDLJ मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही...

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा.

आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो,
आणि
माझा 'संकष्टी चतुर्थी' चा.


जिप्सी

Monday 26 October 2015

Human Being

1st they called me 'Christian' & set me into the fire,
Then they called me as a 'Hindu' & killed me in godhra
&
Now they referred me as a 'Muslim' & lynched me in dadri.
somewhere they forgot that "I" am just a human being.



Gypsy

Sunday 11 October 2015

धर्म संकट में

सच बोलूँ यहाँ हर कोई बेईमान है,
धरम तेरा कौनसा ईमान है ?

मंदिर-मस्जिद के दंगों में बटे है सारे,
जिंदा बचे हुए कुछ इंसान है !

तू कौनसी कश्मकश में हैं ए जिंदगी ?
हर कोई यहाँ हैरान है !

जिंदगी की कीमत क्या लगाते हो बाबू,
मरना तो यहाँ बहौत आसान है !

टूटते हुए इन शीशों के साथ,
एक टुटी हुई उड़ान है !!

जिप्सी